मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील नऊ रस्त्याचे आज पालकमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते भुमिपुजन,सेनेत मात्र नाराजीचा सूर

557
           मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा वेगाने प्रवास सुकर होणार असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज  नऊ रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या भुमिपुजन कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्याना विश्वासात न घेतल्याने त्या कार्यकर्त्यानी  नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हि नाराजी  शिवसेना तालुका प्रमुख यांच्या कार्यपध्दती मुळे ही असल्याचे सांगण्यात आले.
             महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नऊ  रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला सकाळी सिध्दगड येथे अभिवादन करुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  भूमिपूजन  करण्यात आले.
             या कार्यक्रमाला, माजी आमदार गोटीराम पवार,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर,शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे तसेच शिवसेनेचे थोडे व राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. आज झालेल्या भुमिपुजन कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग 61 ते नांदगाव-मानिवली-ठुणे-पाडाळे रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 61 ते टेंबरे बु. जोड रस्ता, माल्हेड-नानकसवाडी-उंबरवाडी रस्ता, राज्य मार्ग ७९-पवाळे–कोलठण-बोरगाव-भादाणे रस्ता, कुडवली-मोहराई-शिरगाव रस्ता, किसळ-संगम रस्ता, धसई-मढ-रामपूर रस्ता, शिरवली-टाकीचीवाडी-फणसोली रस्ता, राज्य मार्ग ७८-मुळ्याचापाडा, चिरड-आंबेटेंबे-ऐनाचीवाडी येथील रस्त्याच्या कामां रस्त्याच्या कामाचा समावेश होता. अशी माहिती उपअभियंता पी. जी. मंगाज यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.या कार्यक्रमानंतर मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यानी नाराजी  व्यक्त करत पालकमंत्री सेनेचे असताना मुरबाड तालुक्यातील शिवसेना पोरकी झाली असुन तालुका प्रमुख याच्या कार्यपध्दतीवर  नाराजी व्यक्त करत  मुरबाड च्या शिवसेना कार्यकर्त्या ची बाजु  खंबीर कधी होणार ? अशी खंत व्यक्त केली.  तर राष्ट्रवादी कॉग्रेस याचा पुरेपुर फायदा उचलत असल्याचेही सांगितले. मात्र विद्यमान आमदार हे सिध्दगड येथिल कार्यक्रमानंतर कुठल्याही भुमिपुजनासाठी न गेल्याने शिवसेना भाजप यातील दुरावा व राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेची जवळीकता असे चित्र आजच्या नियोजनातुन दिसुन आल्याने आगामी निवडणुक पहाता या घटना महत्वाच्या ठरणार अशी चर्चा आता मुरबाडमध्ये  सुरु झाली आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *