शिक्रापूर,पुणे : शिरुर तालुक्याचा पश्चिम भागात थंडीने भरली हुडहुडी,ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

447

शिक्रापूर,पुणे : शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यामध्ये बोच-या  थंडीची लाट कायम असुन ठिकठिकाणी सकाळी व रात्रीच्या सुमारास शेकोट्या पेटत असल्याचे चिञ या भागात पाहावयास मिळत आहे.

मागील आठवड्यापासून कमालीची थंडी वाढल्याने या भागात खूपच हुडहुडी वाढली आहे .उतरेकडील बदलत्या वातावरणामुळे राज्यात व तालुक्यात थंडी जास्त प्रमाणात जाणवत आहे .अडगळीत पडलेले उबदार कपडे लहान मुलांसह मोठयांनी ही बाहेर काढले असून दिवसाही सावलीत कमालीची थंडी जाणवत आहे. तर पडलेली थंडी सध्याच्या पिकासाठी षोषक असल्याने शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे पाहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी नागरिक आपल्या घराच्या आसपास शेकोटी पेटवुन गप्पागोष्टी करताना दिसत आहेत. तालुक्यातील बागायत पट्यामध्ये थंडी जास्त आहे या भागात किमान ८ ते १६ अंश तापमान जाणवत आहे .विशेषःत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, शिक्रापूर ,कासारी, कोंढांपुरी,करंदी, जातेगाव, मलठण , वाघाळे,बुरुजवाडी ,कवठे येमाई ,चाडोह आदी गावामध्ये सुध्दा अद्याप थंडी चांगली आहे बागयत पट्यातील शेतकरी वर्गाला थंडी फायद्याची ठरणार असुन यावर्षी चांगल्या प्रकारे पिके येतील अशी आशा शेतकरी वर्ग  व्यक्त करत आहे.

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *