मुरबाड,ठाणे : मुरबाड पोलिसांकडुन शाळेतील विद्यार्थ्याना कायदा व स्वरक्षणाचे धडे

602
           मुरबाड,ठाणे : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने 2 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान पोलिस दलाकडुन विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमा अंतर्गत  मुरबाड पोलिसानी समाजात व जनतेत कायदा व स्वरक्षणाची जागृती करण्यासाठी  मुरबाड मधिल शालेय विद्यार्थ्याना माहीती देण्याचे काम सुरु केले आहे.
            मुरबाड शहरातील न्यु ईग्लिश स्कुल, मराठी मुलांची शाळा, निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालय यातील विद्यार्थ्याना कायदे विषयक मार्गदर्शन, व मुलीना स्वरक्षण कसे करावे त्याच प्रमाणे पोलिस व समाज यातील जबाबदारी विषयी माहीती दिली. या वेळी मोठ्या संख्येने मुला मुलीनी उपस्थिति दाखवत माहीती जानुन घेतली. यावेळी सर्व शाळांचे शिक्षक वृंद,मुरबाड पोलिस पोलिस ठाण्याचे पो. उप. निरि.निकम,सहा. पो.उप.निरी.म्हसे,गोपनिय पोलिस कर्मचारी विनायक खेडकर, दत्तात्रय भोईर, महिला पोलिस कर्मचारी फाले उपस्थित होते. तर येत्या 6 जानेवारी पर्यत शाळा शाळात जावुन याबाबत जनजागृती करणार असल्याची माहीती खेडकर यानी दिली.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *