मुरबाड,ठाणे : अंबरनाथ पोलिस निरिक्षकावर कारवाई करा रिपब्लिकन पक्षाची मागणी, मुरबाड पोलिस ठाण्यात दिले निवेदन, कारवाई झाली नाही तर रिपाईचे तीव्र आंदोलन- दिनेश उघडे

575
           मुरबाड,ठाणे : मागील महिन्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे 8/12/2018 रोजी संविधान गौरवदिन कार्यक्रमानंतर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील आरोपी प्रवीण गोसावी तसेच पोलीस बंदोबस्तात कर्तव्यकसुर ठेवणारे पोलीस अधिकारी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. या निषेधार्थ आज दि.4/1/2019 रोजी  रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाभर पक्षाच्या वतीने निवेदन दिले असताना मुरबाड पोलिस ठाण्यात ही निवेदन देण्यात आले.
            रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळाराम गायकवाड यांच्या आदेशानुसार , मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांच्यासह शिष्टमंडळाने आज मुरबाड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हल्लेखोर प्रवीण गोसावी याच्यावर कठोर कारवाई करून या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी केली. शिवाय या कार्यक्रमावेळी चोख पोलीस बंदोबस्त न ठेवल्यामुळेच आठवले यांच्यावर हल्ला झाला असा आरोप करीत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आग्रही मागणी देखील  करण्यात आली आहे. यावेळी तालुका सरचिटणीस भूपेश साटपे, कार्याध्यक्ष संजय खोळंबे,उपाध्यक्ष रमेश देसले,संतोष बाईत,सदानंद न्यायकर,लक्ष्मण भांडे,विलास खंडागळे,सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव रवी गायकवाड,गोविंद खोळंबे  विशाल चंदने, सरळगाव विभाग अध्यक्ष शशी जाधव,म्हसा विभाग अध्यक्ष    संजय धनगर,जितू भालेराव,योगेश साटपे,शंकर उघडे,सोमनाथ आगळे,यांच्यासह अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते तर  यापुर्वी सकाळी आरपीआय युवा चे जिल्हा सरचिटणीस सचिन वाघचौडे युवा तालुकाध्यक्ष आण्णा साळवे, धनजंय थोरात जयेश पवार या युवा कार्यकारिणी  नेही  निवेदन दिले होते.
        जर याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही तर रिपाई पक्षाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातीळ पदाधिकारी यांच्या आदेशाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिनेश उघडे यांनी यावेळी दिला.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *