मुरबाड,ठाणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशी येथे रक्तदान शिबीर संपन्न

703

    मुरबाड,ठाणे : नववर्षा निमित्ताने केंद्रप्रमुख व शिक्षकवृंद वेळूक जि. प. केंद्र शाळा व अर्पण ब्लड बँक कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशी येथे शुक्रवार दिनांक 04/01/2019 रोजी सकाळी 10:30 ते 05:00 या वेळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे हे सलग आठवे वर्ष असून ग्रामीण भागातील लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जनजागृती करणे या उद्देशाने केंद्रातील शिक्षकांच्या संकल्पनेतून सदर उपक्रमाची सुरुवात झाली होती.

      आज झालेल्या शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेच्या वतीने डॉ छाया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टीम उपस्थित होती.
       रक्तदान शिबिरासाठी मुरबाड व शहापूर तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री मधुकर घोरड ,केंद्रप्रमुख सौ प्रियंका सुतार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन सदर शिबिर यशस्वी केले.या शिबीरात दर वर्षी रक्त दात्यांची संख्या वाढत असल्याने सलग आठ वर्ष सुरु असलेला उपक्रम  यशस्वी झाल्याचे समाधान आयोजकानी व्यक्त केले.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *