नीरा नरसिहपूर,पुणे : नरसिंहपूर राज्य मार्गावरील शिंदे वस्ती ते पिंपरी बुद्रुक रस्त्यावरील मार्गदर्शक फलक व दगड पडले उखडून,सार्वजनिक बांधकाम विभागाची मात्र याकडे डोळेझाक

655
              नीरा नरसिहपूर,पुणे : नरसिंहपूर राज्य मार्गावरील शिंदे वस्ती ते पिंपरी बुद्रुक रस्त्यावरील मार्गदर्शक फलक व दगड उखडून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची मात्र याकडे सारासार डोळेझाक होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.या  रस्त्याचे काम होवून दोन महिन्याचा कालावधी होत असताना या रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची झलक दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे मात्र दुर्लक्षच करीत असल्याचे प्रवाशी व नागरिकांतुन बोलले जात आहे.
              शिंदे वस्ती ते पिंपरी बुद्रुक रस्त्याच्या कामासाठी २५ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यातून सात किलोमीटर रस्त्याचे मुरूमीकरणासह डांबरीकरण पुर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये ३५ फुट डांबरीकरण व दोन्ही बाजूला प्रत्येकी सात फुटाची साईड पट्टी सोडण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी ५० ते ५५ फुटाची झाली आहे.
       तर वळण, शाळा, थांबा याची दिशा दाखवणारे फलक ठिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच रस्त्याची दुतर्फा कड समजण्यासाठी सिमेंटचे खांब गाडण्यात आले आहेत. परंतु दिशा दर्शक फलक व सिमेंटचे खांब खोलवर गाडले नसल्याने दोन महिन्यातच उखडून पडले आहेत.
        रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनांच्या वेगात वाढ झाली आहे. त्यामुळे साईट वरील दिशा दर्शक फलक व सिमेंट खांब नसल्याने अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे साधे डोकवूनही बघत नसल्याने अपघात घडल्यास जबाबदार अधिकारी, कर्मचारी की ठेकेदार ?  असा सवालनागरिकांतून केला जात आहे.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *