मुरबाड,ठाणे : मुरबाड -कल्याण मार्गावरील प्रवासी प्रदुषणाच्या विळख्यात, अनेक प्रवासी खोकल्याच्या त्रासाने हैराण

834
         मुरबाड,ठाणे : मुरबाड -कल्याण राष्ट्रीय महामार्ग प्रदुषणाच्या विळख्यात असुन या मार्गावरील प्रवास करणारे अनेक प्रवासी खोकल्याच्या त्रासाने हैराण असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. या महामार्गावर अनेक नामांकित शाळा असुन मुरबाड परिसरातुन अनेक विद्यार्थी या शाळामध्ये जातात. मात्र प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या या विद्यार्थ्याच्या आरोग्यावर मोठाच विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
         कल्याण पोर्णिमा पोलिस चौकी पासुन, शहाड, म्हारळ, वरप व  मुरबाड कडे राष्ट्रीय महामार्गावर  कॉक्रीटीकरनाचे  काम सुरु आहे.  या कामात एकाच वेळी खोदकाम, मातीकाम, उत्खनन कामे सुरु आहेत. त्यातच अवजड वहाने व छोटी वाहने, रिक्षा, मोटरसायकल या वाहना च्या धुरामुळे व रस्त्याच्या कामामुळे उडणारी धुळ यामुळे प्रवाशांच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम होताना दिसत आहे. सकाळी शुध्द हवेतुन कामावर निघणारे मुरबाड व दुर्गम भागातुन येणारे कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग हे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवा मैल ते पुढे कल्याण कडे जाताच तोंडावर रुमाल, मास लावुन प्रवास करतात. मात्र या तुन श्वसन क्रियेला त्रास होताना दिसत असल्याने मुरबाड व ग्रामिण भागातुन प्रवास करणारे अनेक प्रवासी आजाराने त्रस्त होताना दिसत असुन कल्याण मुरबाड मार्गावरील वाढत्या प्रदूषणात प्रवास करावा लागत असल्याने मुरबाड सह ग्रामिण भागातील नागरिकांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *