मुरबाड,ठाणे : मुरबाड पंचायतसमितीच्या आवारात पडक्या पोल मुळे रोड लाईट बंद, दुरुस्ती कुणाकडे हे कुणालाच माहीत नाही, या प्रश्नी अधिकाऱयांची मात्र टोलवाटोलवी

636
         मुरबाड,ठाणे : मुरबाड पंचायत समितीच्या आवारातुन ग्रामिण रुग्णालय व म्हसा रोड यांना  जोडणाऱ्या रस्त्यावर रोड लाईटचे पोल आहेत.  मात्र हे पोल वाकलेल्या स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळेस या परिसरातील रोड लाईट बंद असते.
          मुरबाड मुख्य बाजारपेठ मधुन पंचायत समिती कार्यालय, ग्रामिण रुग्णालय मुरबाड व म्हसारोड यांना जोडणारा रस्ता आहे.  या रस्त्यातुन रात्री अपरात्री  नागरिकाची व रुग्णाची  ये जा असते. मात्र वाकलेल्या पोल मुळे रोड लाईट बंद असल्याने नागरिक व रुग्णाना अंधारतच जावे लागते तर अंधाराचा फायदा घेवुनकधीकधी तर  लुटमारीचे प्रकारही  घडत असल्याची चर्चा आहे.
 या वाकलेल्या पोलच्या दुरुस्ती बाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे याना विचारले असता सदर पोल बदलने अथवा देखभाल दुरुस्ती ज्याच्या परिसरात हा पोल आहे त्याची आहे. त्यामुळे त्यानी यावर उपाययोजना केली पाहीजे तर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी दोडके यांच्याशी संपर्क साधला असता परिसर जरी आमचा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपंचायत प्रशासन यानी याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र या प्रकारात हा वाकलेला पोल किती दिवस याच परिस्थिति त ऊभा राहील हा प्रश्न चिन्ह असुन कुणीही करा पण रस्त्यावरचा अंधार दुर करा अशी मागणी नागरिक व रुग्णालयातील रुग्णातील नातलग करत आहेत.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *