वढू बुद्रुक,पुणे : कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०१८ आशा राजाराम सकट यांना पुण्यात प्रदान शिरूर तालुक्यातील आदर्श,उपक्रशील शिक्षिका व भारत सरकारचा उत्कृष्ट जनगणना प्रगणक पुरस्कार प्राप्त शिक्षिका

635
        वढू बुद्रुक,पुणे : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०१८ या उपक्रमात”राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार२०१८  चा “कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार” शिरूर तालुक्यातील आदर्श,उपक्रशील शिक्षिका आशा राजाराम सकट यांना नुकताच सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार व जेष्ठ पत्रकार ह भ प श्यामसुंदर सोन्नर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे हे होते.
         पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात आशा सकट यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व महावस्त्र समारंभ पूर्वक देण्यात आले. आशा सकट यांना आतापर्यंत ,तालुका,जिल्हा परिषेदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला असून विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.तालुक्यात शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध असून त्यांना भारत सरकारचा उत्कृष्ट जनगणना प्रगणक पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन रसाळ, केशव जगदाळे, अमोल सुपेकर, प्रकाश सावंत, के एल गोगावले, आदर्श शिक्षक नानाभाऊ कणसे, पुरस्कार प्राप्त कल्पना कणसे, अलका रसाळ ,शैलजा दळवी या उपस्थित होते
– प्रतिनिधी ,राजाराम सकट(सा. समाजशील,वढू बुद्रुक)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *