सणसवाडी,पुणे : वरीष्ठांच्या व समाजाच्या विश्वासाला पात्र ठरलो हेच समाधान – सदाशिव शेलार; युवा वर्ग व सणसवाडी ग्रामस्थांतर्फे शिक्रापुर पोलिसांचा सत्कार

846

         सणसवाडी,पुणे : सर्वत्र सांशक वातावरण असतांना समाजातील सर्व थरातील लोकांसी सर्वांगांनी संपर्क साधला व गेल्या वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भिमा ,सणसवाडी परिसरात बाह्य समाजकंटकांनी केलेली जाळपोळ अपुऱ्या पोलिसबळामुळे आटोक्याबाहेर गेली तो बॅडपॅच पुसून कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडलागडचिरोलीमिरज,आदी डझनभर दंगलग्रस्थ भागात उत्तम कामगिरी बजावलेमुळे प्रशासनाने शिक्रापुर साठी बदली केलीत्या वरीष्ठांच्या व समाजाच्या ही विश्वासाला सर्व तरुण तडफदार सहकाऱ्यांचे बळावर पात्र ठरलोहेच मोठे समाधान व सत्कार आहेअसे प्रतिपादन सणसवाडीतील तरुणांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना शिक्रापुरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केलेसणसवाडीतील युवावर्ग व ग्रामस्थांतर्फे १ जानेवारीचा कार्यक्रम एकदम शिस्तबध्द वशांततेत पार पाडल्या बद्दल शिक्रापुर पोलिसांचा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहामध्ये सत्कार करण्यात आलाअध्यक्षस्थानी सरपंच रमेश सातपुते होतेया वेळी गतवर्षी कायदेशिर कामात युवकांनी  सहकार्य केलेले सणसवाडीचे भुमिपुत्र ॲडगणेश दरेकर व ॲड विजयराज दरेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

        यावेळी पं..उपसभापती मोनिका हरगुडेशिरुर तालुका कॅाग्रेसचे अध्यक्ष वैभव यादवबाजार समितीचे संचालक दत्ता हरगुडेसरपंच रमेश सातपुतेउपसरपंच नवनाथ भुजबळवरीष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव शेलारकार्यक्षम फौजदार खोसेफौ.वारूळेॲड.गणेश दरेकरराष्ट्रवादी ग्रा..जि.उपाध्यक्ष नामदेव दरेकरता.उपाध्यक्ष सोमनाथ दरेकरमा.उपसरपंच रमेश दरेकरभाजपा आघाडीचे बाळासो सैदविद्याधर दरेकर,सतिष दरेकरशिवसेना शाखाध्यक्ष सोमनाथ शेळकेभानुदास दरेकरगाडामालक संघटनेचे शरद दरेकर,मा. उपसरपंच सुनीता दरेकरग्रामपंचायत सदस्या गिता हरगुडेसुनीता दरेकरआशा दरेकरमा. मुख्याध्यापक बाबासो साठेआयोजक युवक अतुल वाखारे,सचिन दरेकरमच्छिन्द्र दरेकरबाळासो दरेकरअक्षय दरेकरतुषार दरेकरदिवेश दरेकरहनुमान तालीम मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.  

        प्रास्ताविकात ॲडविजयराज दरेकर यांनी या कार्याबद्दल पोलीस दलाचे कौतुक केले. फक्त भविष्यात अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये अशी मागणी केली. मागे  व आताही सर्व परिस्थिती योग्यरीत्या हाताळलेल्या फौजदार वारुळे व खोसे यांचेही कौतुक केले. यास्तव हा अल्प सत्कार सरपंच व ग्रामस्थांचे हस्ते करणेत आला. गावकरभारी सोमनाथ दरेकर यांनी थोड्या समाजकंटकांनी आमच्यासारख्यांचा काही संबंध नसताना नावे गोवल्याबद्दल खेद व्यक्त केला. उपसरपंच नवनाथ भुजबळयांनी अशाच कामाची अपेक्षा व्यक्त करत यापुढेही गावातर्फे सर्व सहकार्याची ग्वाही दिली.मा. सरपंच दत्ता हरगुडे यांनी गावात एकोपा असल्याने अन्यायाविरुद्ध दंगलप्रसंगी पोलिसांच्या मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगून दंगल प्रकरणात गोवलेल्या तरुणांवरील केसेस मागे घ्याव्यात अशी विनंती केली. उपसभापती मोनिका हरगुडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेलारफौ. खोसे व गेल्यावर्षापासून प्रभावीपणे युवकांत विश्वास निर्माण करणाऱ्या फौ. वारुळे यांचे विशेष आभार मानले.

          सत्काराला उत्तर देताना फौ. खोसे यांनी ही चॅलेंजिंग पोस्ट स्विकारणाऱ्या पी.आय. शेलार यांच्या अनुभवाच्या व मार्गदर्शनाच्या बळावर आम्ही हे अग्निदिव्य पार पडल्याचे सांगितले. फौ. वारुळे यांनी हे प्रकरण हाताळताना या युवकांची प्रवृत्ती गेन्हेगारी नसल्याचे समजल्याने समुपदेशन केले व कार्यकर्त्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण केल्याचे सांगून गेल्या ६ महिन्यांपासून केलेल्या सर्व प्रशासकीय तयारीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. ५ हजारांवर पोलिसांच्या बंदोबस्तावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेलार यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल व सत्काराबद्दल आभार मानताना सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः मदत करण्याची भावना व्यक्त करताच टाळ्यांच्या गजरात युवकांनी स्वागत केले. परिसरातील कंपन्यांमध्ये ठराविक लोकांचीच मक्तेदारी निदर्शनास आल्याने ती मोडीत काढून आय.टी.आय.डिप्लोमा,मेकॅनिकल इंजिनिअर झालेल्या युवकांना कंपन्यांमध्ये नोकऱ्यारोजगार देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन औद्योगिक सुरक्षा समिती स्थापन करून बेरोजगारी हटविण्याचे शुभ संकेत दिले.

          सरपंच सातपुते यांनी छत्रपती शिवाजीधर्मवीर संभाजीसंत तुकाराम-ज्ञानदेवयांच्या आळंदीदेहूवढू परिसरातील या भूमीत जातीय सलोखा असून १८ पगड जातीचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदतात. पण काही बाहेरच्या समाजकंटकांनी स्वार्थी राजकारणापोटी हे विष पेरलेपण आता पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी कुठेही गालबोट लागले नाही. म्हणून  त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच असून पी.आय. शेलार यांचे युवकांना नोकऱ्या देण्याच्या प्रयत्नांविषयी आभार मानले.वैभव यादव यांनी शेलार साहेबांच्या सर्व सहकार्याचे व उपस्थितांचे आभार मानले.  

– प्रतिनिधी,ज्ञानेश्वर मिडगुले,(सा.सनाजशील,सणसवाडी)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *