कवठे येमाई,पुणे : आगामी मकर संक्रातीच्या हळदी कुंकू निमित्ताने महिलांनी पर्यावरण रक्षक वाण देण्याचा संकल्प करावा – राणी कर्डिले

1547
         कवठे येमाई,पुणे : आगामी मकर संक्राती सणाच्या हळदी कुंकू समारंभ निमित्ताने महिलांनी पर्यावरण रक्षक वाण देण्याचा संकल्प करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांनी केले आहे.
       पूर्वी मकर संक्रांत अथवा कुठलाही सणास सुवासिनींची ओटी भरून वाण द्यायची पद्धत होती. जी की सर्वस्वी पर्यावरण रक्षणास साजेशी अशीच होती. काळ बदलत गेला तशा रूढी व परंपरा ही बदलत गेल्या. वाणाच्या रूपात देण्यात येणाऱ्या पर्यावरण रक्षक वस्तू जाऊन त्यांची जागा पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या वस्तुंनी घेतली. मग हळदी-कुंकवाचे प्लास्टिकचे डबे,स्टीलच्या वस्तू व बाजारात सर्वत्र सहजपणे उपलब्ध चिनी बनावटीच्या स्वस्तात मस्त अश्या वस्तूंनी  घेतली आहे.मकर संक्रांति निमित्ताने पर्यावरणास हानीकारक ठरणा-या अशा स्वस्तात मस्त वस्तूंना उधाण येईल आणि हजारोंनी सुवासिनी त्या वस्तू खरेदी करतील व त्या वस्तूंची देवाण घेवाण होईल. पण यातील ७० टक्के वस्तू या प्लास्टिक च्या असतील. त्यामुळे त्या वस्तूंचा काही एक उपयोग न होता फक्त कचरा जमा होईल. म्हणजेच करोडो टन प्लास्टिक चा कचरा हळदी कुंकवाच्या नावाखाली पर्यावरणात येईल व पर्यावरण प्रदूषणात नक्कीच भर पडेल.      वस्तू भेट न देता – महिलांमध्ये स्वआरोग्य रक्षणाविषयी जनजागृतीची गरज   
आजचा या धावपळीचा जीवनात महिलांचे आरोग्य खुप महत्वाचे आहे ,त्यात महिलांना नेहमी भेडसावणारा प्रश्न  मासिक पाळी आहे या विषयी खुप चुकीचे समाज गैरसमज आहेत. अनेक महिलांना या याबाबत प्रभोदनाची गरज आहे. म्हणुन आपण सर्व महिलांनी मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन पावरले पाहिजे,त्याचा प्रसार,प्रचार केला पाहिजे.यामुळे मासिक पाळीत होणारे आजार होणार नाहीत,सर्व च महिला याचा वापर करावा. म्हणून महिलांनी आगामी मकर संक्रांतीस हळदी कुंकू देते वेळेस वाण म्हणून प्रत्येक महिलांनी सॅनिटरी नॅपकिन भेट दयावे.ज्या  वेळेस विचार बदलेल,तेव्हाच देश बदलेल.यामुळे या उपक्रमाची सुरवात सर्वांनी आपल्या पासून करावी. असे आवाहन ही कर्डिले यांनी केले आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुख समृध्दी च वाण देऊया व या वर्षी नवीन काही तरी उपक्रम करून आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेऊयात असे त्या म्हणाल्या. 
       शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे सहेली सॅनिटरी नॅपकिन ,रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय संस्थेने पूर्णतः इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण रक्षक अशा पद्धतीने तयार केलेले आहे. महिलांना अंत्यत माफक दरात उपलब्ध होतील .यामुळे चिनी स्वस्त वस्तूंच्या लोभात न पडता आणि भपंक पणाच्या विळख्यात न अडकता साध्या वस्तूंचा स्वीकार करावा व इतर महिलांना ही याबाबत जनजागृती व प्रभोधन करण्या इतकं मन आपण मोठं ठेऊच शकतो.जेणेकरून आपण किमान दोन लाख स्त्रियांनी जरी हा संकल्प घेतला तरी स्वआरोग्य रक्षणासाठी मोठाच फरक पडू शकतो.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *