मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील गणेशत्सोव,मोहरम डिजे मुक्त, जुगार व दारुबंदी करुन साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

559

     मुरबाड,ठाणे : गणेशोत्सव व मोहरम सणा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुरबाड पोलिस  ठाण्यात आज  मंगळवार दि. ११ रोजी  शांतता  कमिटी,मौहल्ला कमिटी व महिला कमिटीची बैठक झाली. या वेळी सणा दरम्यान व गणेशत्सोव काळातील मिरवणुकीत डी जे  मुक्ती सोबत जुगार व दारू बंदी करुन सण साजरा करावा असे आवाहन मुरबाड पोलिस उपविभागिय आधिकारी राजेद्र मोरे यांनी केले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र मोरे , पोलिस निरीक्षक अजय वसावे, पीएस आय खरमाटे,नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर,उप नगराध्यक्ष अर्चना विशे, नगरसेवक नारायण धुमाळ, रविद्र देसले, महिला कमिटिच्या नंदा गोडांबे, तेलवणे मँडम, रंविद्र चंदने, हरेश पुरोहित व पत्रकार उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी अवैध रित्या दारू विकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे व मिरवणुकीचे वेळी डी जे  बंदी सोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले. तर जुगार खेळणाऱ्याची गय केली जाणार नाही. गणेशत्सोव मंडळानी महिला भाविक तसेच सुरक्षेचा उपाय करताना पोलिसाना मदत करण्याचे आवाहन केले.

           मुरबाडच्या नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतात असे सांगून गणेश विसर्जन ठिकाणी नगरपंतायतीच्या वतीने  सुविधा उपलब्ध  करणार असल्याचे सांगत पोलिसांनी सतर्क राहण्याची सूचना केली.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *