शिरूर,पुणे पिंपळाची वाडी, ता. शिरूर येथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असलेल्या ठिकाणी शिरूर महसूल विभागाचा छापा, या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल – रणजित भोसले

1378
           शिरूर,पुणे :  शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी येथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असलेल्या ठिकाणी शिरूर महसूल विभागाने छापा टाकला. यात  सुमारे १०० ब्रास  गौण खनिज अनधिकृतरित्या शेतात साठवून ठेवल्याचे आढळून आले असून या बाबतची तक्रार तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने संबंधित मंडळ अधीकारी यांच्या पथकाने आज मंगळवार दि.  दिनांक ११ रोजी कारवाई केली असता, पिंपळाची वाडी याच्या पलीकडे असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दानेवाडी व राजेवाडी येथून तसेच काही प्रमाणात पिंपळाची वाडी येथून सदर उत्खनन होत असल्याचे दिसून आले आहे.
तथापी  सदर उत्खनन करून दोषी व्यक्ती कडून सदरचे अंदाजे ९० ते १०० ब्रास गौण खनिज पिंपळाची वाडी येथील नदी कडेला असलेल्या गट क्रमांक ४५४ मध्ये साठा केलेला आढळून आला आहे. सदर उत्खनन करणारी यंत्रसामग्री कोणाची आहे किंवा कोणी आणली आहे या बाबत गावातील कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. तथापि सदर गौण खनिज साठा ज्या गटात केलेला होता त्याचा पंचनामा करून संबंधित गटातील व्यक्ती यांचेवर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. तसेच संबंधित व्यक्तीयांना दंडात्मक कारवाई साठी च्या नोटीस देऊन दंडात्मक कारवाईही करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार भोसले यांनी दिली.
– ब्युरो रिपोर्ट,समाजशील न्यूज,शिरूर पुणे 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *