परभणी : जिल्ह्यातील वरपुडच्या शेतकऱयाकडून अमेरिकन तंत्रज्ञानाचा शेती मध्ये सोयाबीन पिकासाठी वापर

1154
           परभणी : मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी सध्याच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. अश्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्याबाबत मोठं मोठ्या नेत्यांकडुन, कृषी तज्ञांकडुन, संशोधकाकडून  सल्ला दिला जातो.  पण नेमके आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय ? कसे व कुठे याबाबत मार्गदर्शन कधीच दिले जात नाही. अशा या परिस्थितीत परभणी जिल्ह्यातील वरपूड या गावातील एका शेतकऱ्याने केलेला प्रत्यक्षातील शेती मधील प्रयोग हा शेतकऱ्यांना चांगलाच मार्गदर्शक व दिलासा देणारा  ठरू शकेलं. वरपुडकर यांनी  केलेल्या प्रयोगा मध्ये जवळपास १३ वेगवेगळ्या सोयाबीन मधील वाणाची निवड करून केलेली शेती पाहणे हे परभणी जिल्ह्यातील शेतीसाठी एक उत्साहवर्दक बाब ठरेल.  त्यांच्या सोयाबीन च्या प्लॉट मधील कोणत्याही प्रकारची किड  आढळुन येत नाही.  त्यासाठी त्यांनी लागवडी  पासूनच नियोजन केलेले दिसून येते. पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी अमेरिकन तंत्रज्ञान वापरून केलेले पाण्याचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून पाहावे असे आहे,नुकतीच त्यांनी ४ एकर क्षेत्रावर मिरची रोपाची लागवड  आधुनिक प्लॅन्टर च्या साहाय्याने केली आहे,सुमारे २० मजूर आणि ४ दिवस लागले असते परंतु या यंत्राच्या साहाय्याने केवळ एका दिवसात ४ एककर क्षेत्रावर लागवड केली त्यासाठी त्यांना फक्त 3 मजूर लागले.
          मजुरांवर लागणारा खर्च आणि पाण्याच्या नियोजनात होणारी तारांबळ यामुळेच शेती ही तोट्याची होत असताना नेमका या वरचाच खर्च कमी करून शेती फायद्याची होऊ शकते व शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या  वाढीस मदत होऊ शकते याचे हे प्रत्यक्ष उदाहरण वरपूडकर यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे,किफायतशीर शेती पाहण्यासाठी शेतकरी व तंत्रज्ञान फार दूर दूर चे अभ्यास दौरे आयोजित करून शेतकऱ्यांच्या प्रगतीस हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात.  अश्यावेळी मराठवाड्यातील व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष करून भेट द्यावी असे हे प्रयोग शेतकऱ्यांच्या प्रगतीस साहाय्यभूत ठरतील हे मात्र नक्की.
– प्रतिनिधी,नईम सय्यद,(सा.समाजशील,परभणी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *