समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे  (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील कवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२४ – २५ साठीची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २३ रोजी सोसायटीच्या कार्यालयात शांततेत व खेळीमेळीच्या संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटी चे विद्यमान चेअरमन दत्तात्रय पडवळ,उपाध्यक्षा विजया बाळासाहेब इचके हे होते. यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, तत्कालीन चेअरमन हौशीराम मुखेकर,सर्व संचालक मंडळ,कर्मचारी व संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते.तर पुणे जिल्हा सहकारी बँकेचे या गटाचे विकास अधिकारी संदीप पडवळ हे यावेळी आवर्जून उपस्थित होते.
 यावेळी संस्थेचे सचिव शुभम सावंत यांनी संस्थेचा लेखा जोखा वाचून दाखवला असता संस्थेचे थकबाकीदार असलेले सभासद यांनी तात्काळ आपल्याकडील संस्थेस देय असलेली थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन व संचालक मंडळाने केले. थकबाकी वसुली साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे यावेळी उपस्थितांमधून ठरविण्यात आले.सभेमध्ये शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे ठरविताना संस्थेची अधिकाधिक प्रगती करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे ठरले. असे असले तरी सन २०२४ – २५ मध्ये सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,सर्व संचालक,व संस्थेचे कार्यतत्पर सचिव शुभम सावंत,कर्मचारी योगेश कांदळकर, मच्छिन्द्र लंघे,त्रिया शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे या वर्षात संस्थेला २९ लाख ९२ हजार २८१ रुपयांचा घसघशीत नफा मिळाला आहे.आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना दिवाळी निमित्त सभासदांना पंधरा टक्के लाभांशाचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले. सादर सोसायटीचे २२०८ सभासद असून बँक पातळीववर १०० टक्के तर सोसायटी पातळीवर ८० टक्के वसुली झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
          लवकरच दिवाळीपूर्वी हा १५ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. दिवाळी पूर्वी सभासदांना लाभांश मिळणार असल्याने सभासदांच्या दिवाळीत आनंदात वाढ होणार असल्याचे युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच बी एम पोकळे,रामदास सांडभोर,उपसरपंच राजेंद्र इचके,पोपट रोहिले,  काशिनाथ पोकळे,आनंदा पवार,कैलास बच्चे,दत्तात्रय पडवळ,विक्रम इचके,रितेश शहा,लीलाबाई इचके,भरत गायकवाड,बाजीराव उघडे हे संस्थेचे मान्यवर संचालक उपस्थित होते.ग्रामस्थांनी संचालक मंडळ,सभासदांचे अभिनंदन केले आहे.आजची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे सोसायटीचे सचिव शुभम सावंत यांनी जाहीर केले.
 
                                                                            
                                                                                                                                             
				


