मुरबाड,ठाणे : मुरबाड मध्ये औद्योगिक कामगारांचा विविध मागण्यासाठी एल्गार; मोर्चा द्वारे तहसीलदारांना दिले निवेदन

620
         मुरबाड,ठाणे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील औद्योगिक कामगार संघटनांनी दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला असतांना मुरबाडमधील हजारो औद्योगिक कामगारांनी शहरात भव्य मोर्चा काढून आपल्या हक्कांच्या मागणीचे निवेदन मुरबाड तहसीलदार यांना दिले.
         शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या भव्य मोर्चाची सुरुवात करून मोदी सरकार चलेजाव,फडणवीस सरकार चलेगाव, कंत्राटीकरण रद्द करा’ आशा घोषणा देत हा एल्गार मोर्चा तहसिलदार कार्यालय येथे जावुन संपला.
 मुरबाडमधील कारखाने मालकांची  होत असलेली दडपशाही तसेच कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे, स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे, मुरबाड एम.आय. डी. सी. तील कामगारांना किमान वेतन अठरा हजार मिळाले पाहिजे, आय. टी. आय., डिप्लोमा डिग्री धारक तरुणांना रोजगारासाठी ८० टक्के प्राधान्य द्या, फ्युजो ग्लास कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना त्वरीत कामावर घेण्यात यावे तसेच कार्यरत असलेल्या कामगांरांची वेतनवाढ करण्यात यावी, मींडा साई, थोरात फिल्ट्ररेशन, अँरो फार्मा, पॉवर ट्रॉनिक्स या कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे, बंद उद्योग सुरू करण्यात यावेत, किमान वेतना सह इ. एस. आय., पी. एफ. तथा इतर लाभ मिळावेत, तसे न करणाऱ्या मालकांवर कारवाई व्हावी, कामगारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलची निर्मिती करण्यात यावी, आशा महिला कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन सामाजिक सुरक्षा लागू करा आशा विविध तालुका स्तरीय मागण्या असणारे निवेदन मोर्चेकऱ्यांच्या वतीने मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांना देऊन कामगारांच्या प्रमुख प्रश्नांवर चर्चा केली.
          तर तालुक्यातील कामगांच्या अडचणींसाठी आपल्या स्तरावर नक्की प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास तहसीलदार सचिन चौधर यांनी दिला आहे. याप्रसंगी मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी विजय विशे, शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष अशोक विशे उपस्थित होते. तसेच या मोर्चाच्या आयोजनासाठी तालुकाध्यक्ष दिलीप कराले, मुरबाड सरचिटणीस सागर भावार्थे, जगनाथ भालेराव, सुनिल लाटे, चंदकात गायकर, रवि टोले, महेष भोईर, चिंतामन म्हसे, समिर भालेराव, अनिल भांडे सह मींडा साई, फ्युजो ग्लास, थोरात फिल्ट्ररेशन, अँरो फार्मा, पॉवर ट्रॉनिक्स या कंपनीच्या कामगारांनी विशेष मेहनत घेऊन हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरबाड पोलीस प्रशासन दक्ष होते.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *