अण्णापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील जि.प. शाळेचा कायापालट करणा-या माशेरेमळा येथील शिक्षकांना ग्रामस्थांकडुन निरोप

951
          अण्णापूर,पुणे : शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मे महिन्यात ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या.  त्यामध्ये आमदाबाद (ता.शिरुर ) येथील माशेरेमळा प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप व अनिता गोसावी या दोन्हीही शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या शाळेत त्यांनी  सौरउर्जा, गांडुळखत ,परसबाग यासारखे प्रकल्प,१०० टक्के विद्यार्थी प्रगत, अनेक उपक्रम राबविले.  तसेच शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळवुन देत शाळेचा कायापालट केला होता. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , आमदाबाद ग्रामपंचायत व माशेरेमळ्यातील ग्रामस्थ व पालक यांनी या शिक्षकांच्या निरोप समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते.
          यावेळी शिरुर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रामदास थोरात व सोसायटी चेअरमन आबासाहेब जाधव यांच्या हस्ते दत्तात्रय जगताप  व अनिता गोसावी यांचा भेटवस्तु देवुन सन्मान करण्यात आला. तसेच  नव्याने शाळेत आलेले शिक्षक रामेश्वर खाकाळ व विनोद नागरगोजे यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांनी या दोन्ही शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत नवीन शाळेतील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानताना नवीन शाळेत चांगले काम करण्यासाठी या शाळेत केलेल्या  कामाचा उपयोग होणार असल्याचे नमुद केले. याप्रसंगी माजी चेअरमन अशोक माशेरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर माशेरे ,शाळा व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष अनिल माशेरे , मेजर भिवाजी थोरात, बी.आर.माशेरे,सतिश थोरात, संतोष माशेरे, फक्कड माशेरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विद्यमान मुख्याध्यापक रामेश्वर खाकाळ, सुत्रसंचालन उपशिक्षक विनोद नागरगोजे यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  अनिल माशेरे यांनी मानले.
– प्रतिनिधी,ज्ञानेश पवार,(सा.समाजशील,अण्णापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *