अण्णापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी, कमिन्स इंडिया व ग्रामपंचायतीने उभारलेल्या आर.ओ.प्लान्टचे झाले उद्घाटन

416
           अण्णापूर,पुणे : निमगाव भोगी (ता.शिरुर ) येथील ग्रामस्थांना शुदध व स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कमिन्स इंडिया कंपनी व निमभोगी ग्रामपंचायत यांच्या वतीने उभारलेल्या आर.ओ.प्लांन्टचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता निमगाव भोगीकरांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.निमगाभोगी येथील ओढयावरील नविन चेक डॅम चे जलपुजनही मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले.यापूर्वी ही कमिन्स इंडिया कंपनीकडून दोन चेक डॅम,अंगणवाडी, व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी कंपाउंड ग्रिल, शाळेतील वर्ग खोल्यांना डिजिटल पेंटिंग,तसेच शेतकऱ्यासाठी गोबर गॅस प्रकल्प,गांडूळ खत प्रकल्प, निर्धुर चुली वाटप करण्यात आलेले आहे. याउद्घाटन प्रसंगी  कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आर. एस. रमन तसेच अमित झपके ,अमित लेले ,कुमार कौशलेंद्र , ज्योति स्मारक ,विकास साळवी ,संभाजी फलके ,निमगाव भोगीच्या सरपंच सुमन राजाराम जाधव,उपसरपंच सुनंदा विठ्ठल पावसे,माजी सरपंच अंकुश इचके,माजी उपसरपंच लक्ष्मण सांबरे,माजी उपसरपंच सचिन रासकर,मेजर नामदेव पावसे,सोसाईटीचे माजी चेअरमन उत्तम व्यवहारे,माजी सरपंच संजय पावसे, मेजर विठ्ठल जाधव,धर्मराज रासकर,विठ्ठल  पावसे, बारकु जाधव,रामदास रासकर,रवि पावसे,भाऊ जाधव,गहीनीनाथ रसाळ,बापू जाधव,कैलास जाधव तसेच ग्रामसेविका वाघोले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.या  सहकार्याबद्दल कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायती तर्फे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच सुमन जाधव , सुत्रसंचालन ग्रामसेविका वाघोले यांनी केले तर सर्वांचे आभार माजी सरपंच अंकुश इचके यांनी मानले.
– प्रतिनिधी,ज्ञानेश पवार,(सा.समाजशील,अण्णापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *