टाकळी हाजी,पुणे : पारनेर तालुक्यातील चोंभूतच्या दिपक नरवडे यांनी फुलविलेल्या शेतीस खासदार आर के सिन्हा यांची भेट.सेंद्रिय शेतीसाठीच्या योगदानाबद्दल नरवडे यांचे केले कौतुक

678
      टाकळी हाजी,पुणे : पारनेर तालुक्यातील चोंभूतच्या दिपक नरवडे यांनी फुलविलेल्या शेतीस आज राज्यसभेतील खासदार आर के सिन्हा यांनी भेट दिली. सेंद्रिय शेतीसाठीच्या योगदानाबद्दल त्यांनी नरवडे यांचे खूपच कौतुक केले.
चोंभूतच्या दिपक नरवडे यांच्या निवासस्थानी त्यांनी फुलवलेल्या शेतीची व त्यांनी बनवलेल्या जिवामृत टैंकची पाहणी करण्यासाठी थेट दिल्लीचे राज्यसभेवर असलेले अरबपती खासदार मा. आर के सिन्हा यांनी त्यांचा संपूर्ण दिवस आज दिपक यांच्या शेतावर सत्कारणी घालवला असेच म्हणावे लागेल.
     काही दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव के. व्ही. के येथे झालेल्या एका प्रदर्शनात केंद्रीय मंत्री मा. प्रकाशजी जावडेकर यांनी दिपक दीपक नरवडे यांचे  त्यांच्या सेंद्रिय शेतीसाठीच्या योगदानाबद्दल कौतुक केले होते. खासदार सिन्हा आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यात दिल्लीत याबद्दल चर्चा झाल्याने आज सिन्हा यांनी चोंभुत वारी करायचे निश्चित केले.
त्यांना तशी दिल्लीहून विमानाने पुणे आणि मग पुण्याहून 100 किलोमीटरहुन अधिक प्रवास करून छोट्या गावी यायची तशी तसदी घ्यायचं विशेष कारण नव्हतं परंतु खुद्द त्यांनीच त्यांच्या मनोगतात हे सांगितले की मला दिपक यांचा सेंद्रीय शेती बाबतचा व्हिडीओ युट्युबवर पाहून त्यांना भेटायची इच्छा झाली.  आणि त्यांचं काम पहायला आज मी सोबत तब्बल 22 जणाची टीम घेऊन आलो असल्याचे त्यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले. त्यांनी टैंकची व शेतीची पाहणी तर केलीच शिवाय वनभोजनाचा मनसोक्त आनंदही घेतला.दिपक यांच्या प्रांगणात त्यांनी तमाम शेतकरी बांधवांना शेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त आणि प्रोतसाहित केलं.
         दिपक नरवडे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं की,  तुमचे आशीर्वाद आम्हा सर्व शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीतुन उत्पन्नाचे नवनवीन उच्चांक गाठण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी भावना व्यक्त केली.
एक खासदार दिल्लीहुन येतात आणि तरुण शेतकऱ्याला शाबासकिची थाप देतात यापेक्षा जास्त सुख काय असू शकतं अश्याच भावना उपस्थितांमधे होत्या आणि आता वेध लागले आहे ते शेतकरी बांधवांच्या भूमिकेकड़े. कारण देशातल्या सध्याच्या परिस्थिती कड़े पाहता शेतकरी बांधवांकड़े पर्यायी फ़क्त आणि फ़क्त फायदा करून देणारी सेंद्रिय शेतीच तारणहार ठरू शकते.
– विशेष प्रतिनिधी,सतीश भाकरे,(सा.समाजशील,टाकळी हाजी,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *