निरा नरसिंहपूर,पुणे : माळशिरस तालुक्यातील संग्राम नगर अकलूज येथील द्रौपदीबाई नायकुडे यांचे निधन

498
           निरा नरसिंहपूर,पुणे : माळशिरस तालुक्यातील संग्राम नगर अकलूज येथील धार्मिक क्षेत्रातील श्रीमती द्रौपदीबाई लक्ष्मण नायकुडे यांचे शनिवारी नायकुडे वस्ती येथे राहते घरी वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे संस्थापक संपादक साप्ताहिक अकलूज वैभव, पा. वृत्त एकसत्ता संपादक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्यविधी समयी समाजातील सर्व स्तरावरील मान्यवर आप्तेष्ट,नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर,पुणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *