शिक्रापूर,पुणे : सणसवाडी मध्ये स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न,एटीएमला पैसे भरण्यासाठी आल्यानंतर दुपारी प्रकार उघडकीस,या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

936

       शिक्रापूर,पुणे : सणसवाडी ता. शिरूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे असलेले एटीएम मशीन फोडून त्यामधील रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास केला असून शनिवारी दुपारी एटीएम मशीन मध्ये पैसे भरणाऱ्या एजन्सीचे कामगार आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे.

       सणसवाडी ता. शिरूर येथील भैरवनाथ मंदिराशेजारी सॅमसंग मोबाईल शॉपी या दुकानाच्या खाली स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे.  सदर मशीन रात्री अज्ञात चोरट्यांनी कशानेतरी उचकटून त्यातील रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला आहे. आज दुपारी एटीएम मशीन मध्ये रक्कम भरणाऱ्या एजन्सीचे कामगार मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी आले असताना त्यांना सदर प्रकार लक्षात आला. मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कामगारांना सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती सदर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. त्यांनतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चॅनल मॅनेजर माधव काटकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यांना चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने येतीयेम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. तर याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चॅनल मॅनेजर माधव रघुनाथ काटकर रा. मधुबन कॉलनी फातिमानगर हडपसर पुणे मूळ राहणार मंगळवार पेठ भोर ता. भोर जी. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहेत.

बँकांच्या अधिकाऱ्यांना जाग येणार कधी ?

पुणे नगर रस्त्यावरील सणसवाडी, कोरेगाव भिमा, वाघोली, सणसवाडी येथे अनेक वेळा एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार घडले असून, कित्येकदा मशीन मधील पैसे चोरून नेण्यात देखील चोरटे यशस्वी झाले आहेत. तर शिक्रापूर येथील एटीएम मशीनच चोरट्यांनी लांबविले होते. बँकांच्या बाबतीत अनेकदा असे प्रकार होऊन देखील बँकांच्या वतीने सुरक्षाव्यवस्था नेमण्यात येत नाही. त्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार असा सवाल नागरीक करत आहेत. 

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *