दोंडाईचा,धुळे : अटल महाआरोग्य शिबीरासाठी २७० रुग्णांना धुळे येथे रवाना

825
          दोंडाईचा,धुळे :  धुळे जिल्ह्यातील दोडांईचा शहरातील दिंनाक १६ रोजी अटल महाआरोग्य शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय दोडाईचा व भाजपा दोडांईचा वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुर्व तपासणी शिबिराचे उदघाटन पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी उपजिल्हा रुग्णालय दोडांईचा येथे केल होते. व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचारींना रुग्णांना शिबीराचा अधिकाधिक लाभ मिळवुन देण्याचे आवाहन केले होते. त्याअनुपंगाने दोडांईचा शहर व परिसरातुन १७०० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन अंदाजित ५०० रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या सर्व रुग्णांची जाण्या-येण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्ष दोडांईचा शहर तर्फे करण्यात आली.  याकामी त्यांना दोडांईचा शहरातील शिक्षणासोबत सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या नामवंत शैक्षणीक संस्था हस्ती पब्लीक स्कुलचे अध्यक्ष कैलास जैन,रोटरी पब्लीक स्कुलचे अध्यक्ष हिमांशु शाह, अहिंसा इंटरनँशनल स्कुलचे अध्यक्ष राजेश मुणोत यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी २७० रुग्णांना शहराध्यक्ष प्रविण महाजन,सरचिटणीस जितेंद्र गिरासे,वैद्यकीय आघाडी प्रमुख डाँ मनिष गिरासे,डाँ अनिल धनगर,राजु जांबाँज देशमुख,महेंद्र गिरासे,बिपीन गिरासे ,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डाँ ललीतकुमार चंद्रे, नितीन ठाकुर, जाधव सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मराणार्थ धुळे येथे आज रोजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल व मान्यवरांच्या उपस्थितीत हे  शिबिर होत आहे .
शिबिराचे प्रास्ताविकात शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी शिबिरात सर्व साधारण आजारापासुन अतीशय दुर्धर आजारापर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या,औषधोपचार,शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत असे सांगीतले .
– प्रतिनिधी, समाधान ठाकरे, (सा.समाजशील,दोंडाईचा



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *