पातूर,अकोला : पातूर येथे शेतकरी जागर मांचाचा भव्य मोर्चा पातूर तालुका तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा मागणी; नायब तहसीलदार पंडित खुळे यांना मागण्यांचे निवेदन सादर

397
           पातूर,अकोला : शासनाने यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला,परंतु अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याला शासनाने वगळल्याने तसेच या आधी सदर संघटनेने आधी निवेदने देऊन समस्यां मार्गी लावण्याचे सांगून सुध्दा शासनाने दखल न घेतल्याने शेतकरी जागर मंचाने आज दि.12 जानेवारी रोजी संभाजी चौका मधून शेतकऱयांचा भव्य मोर्चा काढून,थेट तहसील कार्यालयात नेऊन नायब तहसीलदार पंडित खुळे यांना निवेदन दिले.
             पातूर तालुका दुष्काळ घोषित करून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दाबाचा वीज पुरवठा सलग आठ तास देण्यात यावा, मुद्रा लोनची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे, सिंचन विहीर फळबाग योजनेनेचे मिळणारे वार्षिक अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात यावे तसेच संपुर्ण कर्जमाफी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, पातूर तालुक्यातील कालवे आणि शेततळ्याची कामे तात्काळ मार्गी लावावे, तसेच विध्यार्थ्यांना मोफत एसटी पासेस मोफत उपलब्ध करून देऊन,वन्य प्राण्यांच्या नुकसानि मुळे प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने दयावे, या आषयाचे निवेदन शेतकरी जागर मंचच्या वतीने नायब तहसीलदार यांना देण्यात आले  निवेदनामध्ये  प्रशांत गावंडे, गजानन हरणे,हिदायतखान, अंबादास देवकर,परशराम उंबरकर, दशरथ शेवलकर, उद्धव आवटे,विनोद तायडे,अण्णा पाटील,राजाराम एनकर, गजानन बारतासे, ज्ञानदेवराव आढवू, गजानन उगले, विजय निमकंडे, दिलिपी इंगळे,मोहन गाडगे,दिलीप फुलारी,अलका उगले,छायाताई उगले,शकुंतलाबाई बंड, ज्योतिताई फुलारी,नंदाताई एनकर, सविता उगले,शोभाबाई उगले,रुक्मिणीबाई निमकंडे,शुभांगी उगले,अनुसयाबाई खडसे, कमलाबाई पाटकर, प्रमिला भालतीलक,कमलाबाई पाचपोर, सुमित्रा कोकणे,कासाबाई राठोड,शेख मुख्तार,सय्यद अकबर,कयुम शहा,गजानन गाडगे आदींसह शेकडो महिला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर होत्या.
– प्रतिनिधी,श्रीधर लाड,(सा.समाजशील,पातूर,अकोला)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *