पुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या टेलिकम्यूनिकेशन इंजिनीअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे (टेसा) ‘टेकक्राफ्ट’ महोत्सव संपन्न

1059
          पुणेपुणे विद्यार्थी गृहाच्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या टेलिकम्यूनिकेशन इंजिनीअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे (टेसा) ‘टेकक्राफ्ट‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक गोष्टींवर आधारलेल्या या महोत्सवात एकूण १८ स्पर्धा आयोजिल्या होत्या. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी, व्हीआयटी, कमिन्स महाविद्यालय, एआयएसएसएमएस, व्हीव्हीआयटी यासह इतर महाविद्यालयातील १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. 
मुलाखतीसाठी ‘मॉक प्लेसमेंट’, फोटोग्राफीसाठी ‘शटर-अप, व्हिडीओनामा’, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी ‘डिजिट्रीक्स’, तांत्रिक शब्दांच्या मूकाभिनयासाठी ‘टेकऍक्ट’, ‘ट्रेझर हंट’, संशोधनासाठी ‘टेकटेड’, ‘गुगलर, टाईपफेस्ट’, ‘मार्केटाईजमेन्ट’, ‘टेक्नो स्केच’ ‘रोबो’, ‘सी-बग्ज’, ‘पीसीबी वॉर्स’, ‘ब्रेनोव्हा’, ‘काउण्ट्रॅक्ट’ अशा विविध स्पर्धांचा यात समावेश होता. गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘टेसा’ या विद्यार्थ्यांच्या असोसिएशनतर्फे वृक्षारोपण, वृद्धसेवानिर्माल्य संकलन असे अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबविले जातात.  नुकत्याच झालेल्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी ‘टेसा’तर्फे कपडे पुरवण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना रोपवाटप  करण्यात आले. या महोत्सवातून विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी या महोत्सव उपयुक्त ठरतो. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन  शाखेतील विध्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवासाठी मेहनत घेतली, असे महाविद्यालयाचे कुलसचिव सुनील रेडेकर यांनी सांगितले.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *