इंदापूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील वनजमीन राखीव वनक्षेत्रामधुन वगळण्यात येऊन प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा दयावी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

436
   इंदापूर,पुणे : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले यांच्या शिष्टमंडळाने वनजमा आयुक्त सुभाष बोरकर यांना मागण्यांचे निवेदन देताना   
         इंदापूर,पुणे : लाखेवाडी ता.इंदापुर येथे वनक्षेत्रामध्ये राहत असलेल्या अंदाजे २०० ते २५० कुंटुंबीय सध्या शासनाच्या घरकुल योजनेमधुन बांधलेल्या घरात रहात असुन त्या कुंटुंबांना राहण्यासाठी कायम स्वरूपी जागा देेऊन त्यांच्या नावे दोन गुंठे जमीन करावी. कुलदैवत भवानीमाता मंदीर,विठ्ठल रूक्मीणी मंदीर,स्मशानभुमिसाठी जमिनीचा ताबा ग्रामपंचायतीकडे कायम ठेवावा. अशा अनेक मागण्याचे निवेदन वनजमा आयुक्त सुभाष बोरकर यांना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी जि.प.सदस्य श्रीमंत ढोले,सरपंच सोमनाथ गायकवाड,उपसरपंच वामन थोरवे,संदीप साबळे,हनुमंत सानप,बापुराव ढोले,जाम्बवंंत ढोले,गणेश भिंगारदिवे,दतात्रय भिगारदिंवे,ज्ञानदेव भिंगारदिवे,बाळासो शिंदे,बबन गायकवाड आदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
          माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,वनपरिक्षेत्रामध्ये  रहात असलेल्या लोकांना कायद्याच्या चौकटीत राहुन दोन गुंठे जागा नावावर करावी.धार्मीक स्थळाला जागा दयावी.या सर्व गोष्टींवर ग्रामपंचायतीचा ताबा व वहिवाट आहे त्यामुळे या जागा राखीव वनक्षेत्रामधुन वगळण्यात याव्यात.शेवटी सर्वसामान्य लोकांचा विचार करावा व या सर्व लोकांना न्याय मिळेल अशी भुमिका घ्यावी असे वनजमा आयुक्त सुभाष बोरकर यांना सांगितले.व संबधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन  या लोकांना योग्य तो न्याय कसा देता येईल याविषयी प्रयत्न केला जाईल असे ही ते म्हणाले.
           लाखेवाडी येथील घरकुल योजने मध्ये राहणाऱ्या लोकांना शासनाने वीज,पाणी,रस्ते अशा सुविधा पुरविल्या आहेत. लोकवर्गणीतुन ग्रामदैवत भवानीमाता मंदीर बांधकाम झाले असुन याठिकाणी पाण्याची टाकी,मंदीर,लोकांचे धार्मीक स्थळेही आहेत.वैष्णव भक्ताचें विठ्ठल रुक्मिणी मंदीर याच जागेत आसून गावातील लोकांच्या अत्यसंस्कार विधीसाठी लागणारी जागा या ठिकाणच्या वनजागेमध्ये आहे अशी माहिती श्रीमंत ढोले यांनी वनजमा आयुक्तांना सांगितली.
सुभाष बोरकर – वनजमा आयुक्त
वनक्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी,ग्रामपंचायतकडे असणारे पुरावे किंवा लेखी म्हणणे कार्यालयाकडे सादर करावे.आम्ही प्रत्यक्षात जागेची पाहणी करण्यास येणार आहे.पाहणीनंतर वरीष्ठांना अहवाल देऊन कायदयाला धरून  योग्य तो निर्णय घेण्यात येईल.कोणत्याही कुंटुंबाला बेघर केले जाणार नाही.
– प्रतिनिधी,सोमनाथ ढोले,(सा.समाजशील,इंदापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *