इंदापूर,पुणे : अस्वच्छता आणि ड्रेनेजच्या असुविधा बद्दल तालुका युवासेना आक्रमक, इंदापुर नगरपालिका नगराध्यक्षांना दिले आरोग्याच्या समस्यांचे लेखी निवेदन

502
             इंदापूर,पुणे : इंदापूर नगरपरिषद हद्दीतील राजवलीनगर येथे अनेक अपार्टमेंट असून यामध्ये हजारो लोकांचे वस्तीस्थान आहे.  सदर परिसरातील रहिवाशांचा परिसरात असणारी अस्वच्छता व दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न उभा राहिला असून त्यामुळे हजारो लोकांचे जीवनच धोक्यात आले आहे.  या परिसरात अनेक वर्षीपासून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी संपूर्ण परिसरात मोकळे सोडले जात आहे.  यामुळे येथील रहिवाशांना अनेक आरोग्याच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. अशा अनेक समस्यांचे निवेदन इंदापूर नगरपरिषेदेला युवासेनेच्या वतीने देण्यात आले.
              यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेजचे पाणी एका खोल खड्ड्यात सोडले जात असून सदर ठिकाणी लहान मुले किंवा नागरिक पडून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.  तसेच सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली असून अनेक भटके कुत्री,प्राणी आणि सापांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेतच लक्ष देऊन समस्याचे व्यवस्थापन तातडीने करावे अन्यथा  होणाऱ्या नुकसानीस पुर्णपणे प्रशासनास जबाबदार धरुन तीव्र स्वरूपात अंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
             यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख  विशाल बोंद्रे, युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, युवासेना तालुका युवा अधिकारी संदिप चौधरी, युवासेना शहर युवा अधिकारी आकाश डांगे, शिवसेना तालुका प्रमुख  संजय काळे, शिवसेना उपतालुका प्रमुख अरूण पवार, शिवसेना शहरप्रमुख ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना विभागप्रमुख दत्तु खुडे, माथाडी कामगार सेना उपतालुका प्रमुख सागर नरळे, शेटफळ शाखाप्रमुख नितीन शिंदे, दुर्वास शेवाळे, महादेव सोमवंशी, अमर बोराटे, अनिल काळेल, सुदर्शन काळेल, वैभव काळेल, सागर कारंडे, अशोक मंजुळकर, चनु बोराटे, सागर नवगीरे आदी युवासैनिक  उपस्थित होते.
– प्रतिनिधी,सोमनाथ ढोले,(सा.समाजशील,इंदापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *