पुणे : बिग मिशन फाऊंडेशन तर्फे पुणे विद्यार्थी गृह येथे आरोग्य शिबिर संपन्न, गृहातील अनेक विद्यार्थ्यानी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

1136
           पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत असणारे पुणे विद्यार्थी गृह हे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. या पुणे विदयार्थी गृहात हजारो विद्यार्थी राहून शिक्षण घेत असतात. येथे वास्तव्य करणा-या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व्हावी या हेतूने गृहाचे व्यवस्थापक अक्षय रावेतकर व मुख्याध्यापक शिंदे यांची विद्यार्थांबाबतची तळमळ लक्षात घेऊन आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविले व काल सोमवार  दि.१७ ला हे आरोग्य शिबीर संपन्न झाले. खऱ्या अर्थाने समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करणारे गुरु या विदयार्थ्यांना लाभले आहेत. पुणे विदयार्थी गृहामध्ये  ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य ती माहिती व्हावी तसेच त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या दूर व्हाव्यात याहेतूने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रुती भालेराव यांनी सा. समाजशीलशी बोलताना सांगितले. अशा या आरोग्य शिबिरातून समाजातील गरजू लोकांपर्यंत आरोग्या बद्दलची जनजागृती केली जाते. यावेळी गृहातील अनेक विद्यार्थ्यानी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
            या शिबिरामध्ये डॉ.निलेश सावंत,डॉ. भक्ती पायगुडे व ज्योती रोकडे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले.बिग मिशन फाऊंडेशनचे आयोजक संतोष वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाचे संयोजक व बिग मिशन फाऊंडेशनचे कार्यकारी नितिन आवेकर,महेश भट,चैतन्य केसकर यांचे या आरोग्य शिबिरासाठी महत्वपूर्ण सहकार्य लाभले.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *