शिक्रापूर,पुणे : सांस्कृतिक स्तोत्र प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली संचलित,नाट्यशाळा चँरिटी ट्रस्ट, मुंबई व बालरंगभूमी अभियान, शिरूर आयोजित प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ संपन्न

753
          शिक्रापूर,पुणे : सांस्कृतिक स्तोत्र प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली संचलित,नाट्यशाळा चँरिटी ट्रस्ट, मुंबई व बालरंगभूमी अभियान, शिरूर आयोजित शिक्षकांना प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. नाटयशाळा चँरिटी ट्रस्ट मुंबई च्या संचालिका श्रीमती कांचन सोनटक्के,बालरंगभूमी अभियान मुंबई च्या सदस्यां सौ.दिपालीताई शेळके,पं. सं शिरूर च्या उपसभापती सौ.जयमाला जकाते,पुणे जिल्हा आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे समन्वयक श्री.प्रकाश खोत,सौ.गीता पाटील, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, नाट्य परिषदेचे सदस्य  राजाराम गायकवाड  प्राथमिक शिक्षक  संघाचे​ जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे यांच्या  प्रमुख उपस्थितीत जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी कांचन सोनटक्के यांनी अभिनयाच्या विविध अंगांची माहिती देवून बालनाटयात मार्गदर्शक शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगितले. प्रशिक्षणा दरम्यान  पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक चे शिक्षणाधिकारी श्री.गणपतराव मोरे यांनी भेट देऊन सदर प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी अभिनय वृत्ती जोपासण्यासाठी करावा व तरुणाई म्हणजे केवळ वीस ते तीस  वर्षाचा वयोगट नसून ज्या वयात आपण नव्या उमेदीने, उत्साहाने काम करतात.  त्याचबरोबर  नाटक हे अभिव्यक्ती ते प्रभावी माध्यम असून अनेक मोठे कलाकार हे बालरंगभूमीतूनच घडले असून पुढच्या पिढीतील अभिनेते घडवण्याची जबाबदारी ही तुम्हां सर्व शिक्षकावर आहे. अशी अपेक्षा  पुणे जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे कार्याध्यक्ष श्री हनुमंत कुबडे यांनी व्यक्त केली.या प्रशिक्षणात आत्तापर्यंत सत्तर शिक्षकांनी नोंदणी केली आहे. सदर प्रशिक्षण १२ ते १९ जानेवारी दरम्यान चालणार असून याचा लाभ जास्तीत जास्त शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे शिरुर तालुका अध्यक्ष सौ दिपालीताई शेळके यांनी केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय मांढरे यांनी केले.
यावेळी श्री.राजेंद्र बोधे, नम्रता  ताई गवारे, सारिका शिंदे, बापुराव कदम इ.उपस्थित होते.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *