शिरूर,पुणे : जिजाऊ जन्मोत्सव शिरूर येथे उत्साहात साजरा; भव्य मिरवणुकीचे आयोजन; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुरस्कार देवून सन्मानित

1151
        शिरूर,पुणे : काल दि. १२ ला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव शिरूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिरूर शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिणींचा राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
        शिरुर येथे वारसा फाउंडेशन,आदिशक्ती महीला मंडळ,रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,वैभवी महासंघ यांचा माध्यमातून जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी भव्य अशा मिरवणुकीचे  आयोजन करण्यात आले होते.शिरुर मार्केटयार्ड येथील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवाभिवाद्न करून मिरवणूक प्रारंभ होते व जिजाऊ उद्यान येथे सांगता होते.त्याचप्रमाणे आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींचा राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुरस्कार देवून सन्मानित करून समाजापुढे एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच,प्रबोधनातून परिवर्तन घडवण्यासाठी व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.
         आयोजनाचे  हे दूसरे वर्ष असून समस्त शिरुरकर  मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाले होते. बालचमुंची संख्या देखील उल्लेखनीय होती. रामलिंग महिला उन्नती संस्था संचालित सहेलि बालसंस्कार केंद्र यातील मुलांनी आकर्षक लेझीम,ढोल वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
          संपूर्ण आसमंत जिजाऊच्या जय घोषातदुमदुमून गेला होता.राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई पुरस्काराच्या मानकरी राजश्री भाकरे व शर्मिला निचित या पुरस्काराला शोभतील असे कार्य त्या करीत असून असे कर्तुत्व असलेल्या स्त्रियांचा सन्मान केल्याने सर्व जण आनंदित दिसत होते.घारु मिस यांनी व सहकाऱ्यांनी सादर केलेली जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका अंगावर रोमांच निर्माण करणारी होती.कोरडे सर यांचे “रयतेची माऊली राजमाता जिजाऊ” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
माहेर आणि सासर दोन्ही कुळ जशी जिजाऊच्या कर्तुत्वाने आणि शौर्याने इतिहासात अमर झाली आहेत त्याच प्रमाणे माझ्या प्रत्येक भगीनीने कर्तुत्वान बनाव,कीर्तीवंत व्हाव आणि जिजाऊ,सावित्रीच्या तेजोमय चारित्र्याचा अंश त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा ही सदिच्छा राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने देण्यात आली.
            अंधश्रद्धेला मूठमाती द्यावी आणि खऱ्या अर्थाने थोर विचारवंत,समाजसुधारक यांचे वैचारिक वारसदार अंगीकारत पुढच्या वर्षी नव्या उमेदीने, आणखीन जल्लोषात व प्रबोधपर कार्यक्रम घेण्याचा माणस मनामधे घेवून ॥ जय जिजाऊ ॥॥ जय शिवराय ॥ या घोषणेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *