पुणे : वडगाव शेरी फाट्या नजीकबी आर टी मार्गाच्या कडेने असणाऱ्या संरक्षण भिंतीत ट्रक धडकला

498
       पुणे : पुण्यात वडगाव शेरी फाट्या नजीक आज बुधवार दि. १९ ला पहाटे साडेपाचच्या दरम्यान एक मालवाहू ट्रक वडगावशेरी बी आर टी मार्गाच्या कडेने असणाऱ्या संरक्षण भिंतीत जाऊन धडकला. सुदैवाने या घटनेत फक्त ट्रकचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत असून अशा घटना यापुर्वी अनेकदा झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या अगोदर देखील काही दिवसांपूर्वी विमान नगर येथे असाच प्रकार झाल्याचा पहावयास मिळाला होता. अशा घटना होऊन ही त्या वारंवार होऊ नयेत म्हणून या गोष्टीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *