पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे प्रदेश प्रवक्तेपदी ॲड.भूषण राऊत यांची निवड,विविध स्तरातून होतेय अभिनंदन

631
          पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे प्रदेश प्रवक्तेपदी ॲड.भूषण राऊत यांची निवड करण्यात आली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणाची वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी एका राष्ट्रीय पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी निवड होणे, हि माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब असल्याचे त्यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले. बरोबर १० वर्षांपूर्वी २००८ साली राऊत यांनी जेमतेम आठवीत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच भाष्य करून त्यांच्यातील वक्तृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पक्षाच्या जडणघडणीत करीत असलेल्या कार्याची दाखल घेत त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवशी पक्षाने त्यांना ही नवीन जबाबदारी देऊन वाढदिवासाची विशेष भेट दिल्याने त्यांच्या मित्र परिवारातून व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 आता पर्यंतच्या माझ्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रवासात मला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आणि साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार,पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला दिलेल्या संधीचे पक्षासाठी मी नक्कीच चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करील. माझी निवड केल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार

– ॲड. भूषण राऊत ( प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 
ॲड.भूषण राऊत हे अत्यंत तरुण वकील व परखड व्यक्तिमत्व  असून त्यांना राष्ट्रवादी पक्षाने दिलेली पक्षाच्या राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी नक्कीच यशस्वीपणे पार पाडतील. त्यांच्या  पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 
                                       – ॲड.शिवाजीराव वर्पे 
– देवकीनंदन शेटे, संपादक, सा. समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *