मुरबाड,ठाणे : दिपक शेलार याची महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातून हिमाचल प्रदेशातील नँशनल कँम्पसाठी निवड

594

          मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील  टोकावडे येथील जयवंतराव पवार कला,वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातून दिपेश शेलार याची हिमाचल प्रदेशातील हतकोटी येथील नॅशनल लेव्हल ऍडव्हेंचर कॅम्प साठी निवड झाली आहे.  तो आज गुरुवारी दि.२०रोजी मनालीला रवाना झाला. केंद्र सरकारच्या युवा व कल्याण विभागा तर्फे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ समन्वयक प्रो. बी.एस. बिडवे व जिल्हा समन्वयक प्रशांत सावदेकर यांनी दिनेश शेलार याची मुंबई विद्यापीठातर्फे कॅम्प साठी निवड केली. त्याच्या निवडीबद्दल जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार संचालक मुरलीधर दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

– प्रतिनिधि:-जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *