तांदळी,पुणे : शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून गणेगाव दुमाला ते तांदळी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ,पं. स. सदस्य राजेंद्र गदादे यांच्या पाठपुराव्याला यश

488
     तांदळी,पुणे : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी ते गणेगाव दुमाला हा रस्ता परिसरातील शेतकरी व नागरिकांना दळणवळणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून हा रस्ता दुरावस्थेत होता. याबाबत या भागातील शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे यांनी शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कडे हा रस्ता व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणेगाव दुमाला व तांदळी परिसरातील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत आमदार पाचर्णे यांनी त्यांच्या 3054  (04) विशेष पुल व मार्ग निधीतून या कामास मान्यता दिली असून आज शुक्रवार दि. २१ रोजी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बबनराव गदादे यांच्या हस्ते या कामाचा  करण्यात आला.
यावेळी शिरूर पंचायत समितीचे सदस्य .राजेंद्र गदादे ,तांदळी गावचे सरपंच गोरख दादा गदादे ,ग्रामपंचायत सदस्य दत्ता अण्णा गदादे,विजय कळसकर,युवा नेते राजु भाऊ गदादे, पिंटु कळसकर,मधुकर गदादे युवा नेते सुनिल भाऊ गदादे उपस्थित होते. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार पाचर्णे व पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांचे अभिनंदन केले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *