शिरूर,पुणे : अहमदनगर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी, एसबीसी संघर्ष समिती शिरूरच्या वतीने तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन

584

   शिरूर,पुणे : अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच त्याने केलेल्या घृणास्पद कार्यवाहीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व पिडित मुलीला शासकीय मदत मिळावी ,तिला वैद्यकीय मदत मिळून कुटुंबास संरक्षण मिळावे या सर्व मागणी साठी एसबीसी संघर्ष समिती,शिरूर च्या वतीने शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.

          यावेळी जिल्हा स्तरावरावर योग्य ती कार्यवाही करण्याकामी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन तहसीलदार भोसले यांनी दिले. यावेळी एसबीसी संघर्ष समितीच्या  तालुकाध्यक्ष शारदा भुजबळ,डॉ.वैशाली साखरे,अलका विधाने कविता साळी, जयश्री उगले,जन्नाबाई मल्लाव,राधा माने, रेखा केळगंद्रे, बंडू दुधाने,ऋषिकेश भुजबळ इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
– ब्युरो रिपोर्ट (सा.समाजशील,शिरूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *