तांदळी,पुणे : कै.केशव पांडुरंग गदादे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी, गावातून ग्रंथदिंडीचे आयोजन

1537
         तांदळी,पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या शिरूर तालुक्यातील तांदळी येथील कै.केशव पांडुरंग गदादे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती आज दि.२२ ला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेच्या प्रागंणात कर्मवीरांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेतील मुला मुलींनी पारंपारिक वेशभूषा परिधाण केली होती.
        तांदळी गावातील चौकाचौकात ग्रंथदिंडीचे उत्स्फूर्त स्वागत व प्रतिमेचे पुजन करण्यात आले.ढोल ताश्या व झांज पथकाने संपुर्ण परिसर कर्मवीरमय झाला होता.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.स्वावलंबी शिक्षणाचा वसा घेऊन बहुजन समाजातील सर्व घटकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सदैव कार्यरत असणारी रयत शिक्षण संस्था शंभर वर्षात प्रदार्पण करीत आहे.संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेचे उपशिक्षक श्री.जाधव पी बी यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते.
         यावेळी शिरूर पंचायत समिती सदस्य राजेन्द्र गदादे, तांदळीचे सरपंच गोरख गदादे,उपसरपंच राजेंद्र कळसकर,तंटामुक्तीचे अध्यक्ष श्यामआप्पा खोरे,जि.प.चे माजी सभापती बबन आण्णा गदादे, दत्तात्रय नलगे,मच्छिन्द्र कळसकर, संजय कळसकर,ग्रा.प.सदस्य शंकरभाऊ गदादे, दत्तात्रय खोरे ,काळुराम खोरे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य दत्ता आण्णा गदादे व मान्यवर उपस्थित होते.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(समाजशील न्यूज नेटवर्क)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *