कवठे येमाई,पुणे : शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी दैनिक सामना चे संपादक खासदार संजय राऊत यांची निवड झाल्याबद्दल पुणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राऊत यांचा सत्कार

800
         कवठे येमाई,पुणे : शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी दैनिक सामना चे संपादक खासदार संजय राऊत यांची निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राऊत यांचा सत्कार  करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार संजय राऊत यांची निवड झाल्याबाबद्दल पुणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुंबई येथील दैनिक सामना कार्यलयात जाऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी पुणे शहर शिवसेना महिला आघाडीच्या स्वाती ढमाले,छायाताई भोसले,सविता बलकवडे,अमृतताई पठारे,कस्तुरी पाटील,पल्लवी नागपुरे,सरोज कर्वेकर ,मनीषा कुलकर्णी,शीला कर्जावणे इत्यादी शिवसेना महिला आघाडीच्या मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *