वढू बुद्रुक,पुणे : आश्रमशाळा शिक्षकांचा संघटन व जिल्हा मेळावा दौंडमध्ये उत्साहात संपन्न

1002
           वढू बुद्रुक,पुणे : दौंड मध्ये हॉटेल शांताई येथे स्वराज्य शिक्षक संघाचा पुणे जिल्हा आश्रमशाळा शिक्षकांचा मेळावा,नूतन जिल्हा कार्यकारणी निवड व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा स्वराज्य शिक्षक संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी ग्रामिण विकास शिक्षण संस्था व शिवनेरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव नानासाहेब पवार व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आदिनाथ थोरात सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, अरुण थोरात विश्वस्त, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिवाजीराव किलकिले विश्वस्त पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, प्रसाद गायकवाड अध्यक्ष दौंड तालुका मुख्याध्यापक संघ, सुंबे सचिव दौंड तालुका मुख्याध्यापक संघ व त्यांचे सहकारी अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच मेळाव्यास मार्गदर्शक म्हणुन स्वराज्य शिक्षक संघाचे राज्य पदाधिकारी प्रदेश कार्याध्यक्ष जयसिंग पाटील,प्रदेश सरचिटणीस प्रवीण देवरे लाभले.कार्यक्रमास सोलापूर जिल्हाध्यक्ष सुभाष शेडबाळ,उपाध्यक्ष  सुधाकर लिगाडे, सातारा जिल्हाध्यक्ष  धनंजय येवले,उपाध्यक्ष सेवा गडकरी, सांगोला तालुकाध्यक्ष  संजय लिगाडे,मंगळवेढा तालुकाध्यक्ष  गंगाधरे यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
            कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी सहकार महर्षी कै.शिवाजीबापु नागवडे यांना सार्वजनिक श्रध्दांजली वाहुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. सन्मान सोहळ्यामध्ये श्री नानासाहेब तात्याबा पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य विलास दत्तात्रय काकडे (आदर्श मुख्याध्यापक )राजु तात्याबा लोखंडे (आदर्श शिक्षक) व जिजामाता माध्यमिक विद्यालय गोपाळवाडीचे श्री सुरेश निवृत्ती होले (आदर्श शिक्षक)या सर्वांना मुख्याध्यापक संघ पुणे यांच्याकडुन अनुक्रमे जिल्हा व तालुका पुरस्कार प्राप्त झाल्याने स्वराज्य शिक्षक संघ पुणे जिल्हयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यानंतर आश्रमशाळा कर्मचारी समस्यावर चर्चा करुन मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्हा कार्यकारीनीची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष  संदिप गोसावी,राजेंद्र जगताप, विलासराव काकडे यांनी केले, सुत्रसंचालन प्राध्यापक सुधाकर गायकवाड,प्रास्ताविक प्रवीण देवरे,आभार  मकरंद पवार यांनी केले.
नूतन पुणे जिल्हा स्वराज्य शिक्षक संघ कार्यकारीनी
 संदिप गोसावी(अध्यक्ष)
 राजेंद्र जगताप (सचिव)
 मकरंद पवार (कार्याध्यक्ष)
 प्रशांत रंधवे (उपाध्यक्ष) शकंर शिंदे (उपाध्यक्ष)
 रमेश रासकर (कोषाध्यक्ष)
 कैलास चौरे (संघटक)
 महादेव आटोळे (संघटक)
दिप्ती भोईटे (महिला संघटक)
सुधाकर गायकवाड (राज्य कार्यकारीनी सदस्य)
– राजाराम सकट, प्रतिनिधी (सा.समाजशील,वढू बुद्रुक)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *