मुरबाड,ठाणे : माळशेज घाटात मोटर सायकल कठड्याला धडकुन मोटरसाइकल स्वार दरीत कोसळुन ठार तर दरीत आणखी एक प्रेत सापडल्याने खळबळ

894
          मुरबाड,ठाणे : माळशेज घाटात मोटर सायकल कठड्याला धडकुन मोटरसाइकल स्वार दरीत कोसळुन ठार झाल्याची घटना घडलेली असताना  दरीत आणखी एक प्रेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

 माळशेज घाटातील गणपती मंदिरा जवळ मोटार सायकल कठड्याला धडकून खोल दरीत कोसळल्याने एका  इसमाचा मृत्यू झाला. त्याचे नाव आकाश कोरडे रा कल्याण असे असून त्याच्या मृतदेहा शेजारीच आणखी एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.  हा मृतदेह कोणाचा आहे व त्याचा मृत्यू कशाने व कधी झाला हे शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
           कल्याण येथिल आकाश कोरडे हा मोटरसाइकल क्र. एम एच 05 सी डी 5932 ही मोटरसायकल कठड्यावर धडकल्याने दरीत कोसळुन जागीच ठार झाला. मात्र त्याचा मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती आणखी एक मृतदेह सापडल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे  हे दोन्ही मृतदेह 1000 फुट खोल दरीत सापडले.  मात्र पहिला मृतदेह हा हत्या आहे का ? याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *