टाकळी हाजी,शिरूर : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला शिरूर,पारनेर मधील पत्रकारांचा पाठिंबा,एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण

958
           टाकळी हाजी,शिरूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दि. 1 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत  पारनेर तालुका पञकार संघ, निघोज बेट टाकळी हाजी पञकार संघ, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ, पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडीया संघ, पारनेर तालुका प्रेस फोटोग्राफर संघ यांच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यानंतर सर्व सदस्य राळेगण सिद्धी येथे जाउन हजारे यांची भेट घेतली व त्याठिकाणी उपोषणात सहभागी होत त्यांना पाठींबा दिला. निघोज-शिरूर बेट पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव उनवणे यांनी यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषनाची सरकारने तातडीने दखल घेण्याची मागणी केली. सरकारने उपोषनाची गंभीरतेने दखल न घेतल्याबद्दल या सर्व संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध केला.
            यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, निघोज पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष ईधाटे, उपाध्यक्ष शिरीष शेलार, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीष रासकर, टाकळी हाजी पञकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, उपाध्यक्ष सतिष भाकरे, समाजशील न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक देवकीनंदन शेटे,इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय गाडगे, खजिनदार सागर आतकर, पारनेर तालुका पञकार संघाचे सहसचिव संजय पुंड, कार्यकारणी सदस्य भास्कर कवाद, कारभारी बाबर, भगवान श्रीमंदीलकर, विकास शेंडकर, प्रेस फोटोग्राफर संघाचे शहराध्यक्ष जयसिंग हरेल, संदीप गवळी, जितेंद्र राऊत,  पत्रकार सुधीर पठारे जयदीप कारखीले, संपत वैरागर, संदीप गाडे, उत्तम घोलप, स्वप्नील भालेराव,  विजय रासकर  आदी तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिष भाकरे यांनी केले जयसिंग हरेल यांनी आभार मानले.
– विशेष प्रतिनिधी,सतीश भाकरे,(सा.समाजशील,टाकळी हाजी,शिरूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *