मुरबाड,ठाणे : शिक्षकांच्या राज्यव्यापी अधिवेशना मुळे मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा बंदच संकट ? तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

475
         मुरबाड,ठाणे : शिक्षकांचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या सोमवार दि 4 फेब्रुवारी 2019 पासुन गोवा येथे सुरु होणार आहे.  या अधिवेशनाला जाण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग रजा टाकत आहे. या मुळे 10 दिवस चालणाऱ्या अधिवेशना मुळे शाळा बंदच संकट ? उभे असुन मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान कसे थांबवता येईल याबाबत शिक्षण विभागापुढे आव्हान ऊभे राहीले आहे.
        मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा बंद न रहाता विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भगवान भगत यांनी सांगितले. दरवर्षी अधिवेशन होते.व या साठी मोठ्याप्रमाणात शिक्षक जातात या अधिवेशनात आगामी धोरणा बाबत चर्चा केली जाते.शिक्षकांची रजा यामुळे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी मुरबाड पंचायत समिती सदस्य व गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी शिक्षक विभागाला पत्र देवुन या रजेला आव्हान देवुन सर्विस बुक मध्ये नोंद करण्याची मागणी केली. तर गटशिक्षण अधिकारी यांनी या बाबत माहीती देताना शासनाच्या ध्येय धोरणा नुसार योग्य ती कारवाई केली जाईल. शाळा बंद राहुन मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगत रजा हि विशेष रजा किंवा शिल्लक रजा यातुन घेता येते. शासन आदेशा नुसार योग्य कारवाई होईल मात्र शिक्षक रजा घेण्यासाठी अर्ज देत असल्याचे त्यांनी सांगितले
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *