मुरबाड,ठाणे : केमिस्ट असोसिएशनच्या बंद मुळे मुरबाड मध्ये रुग्नांचे औषधा वाचून हाल, बसस्थानकाजवळ सुरु असलेल्या एका मेडीकल स्टोअर वर ग्राहकांची औषधांसाठी झुंबड

521
          मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील शहरी व दुर्गम भागातील मेडिकल स्टोर आज केमिस्ट असोसिएशनच्या बंद मध्ये सहभागी झाल्याने मुरबाड शहरासह ग्रामिण भागातील सर्वच मेडिकल स्टोअर बंद असल्याने रुग्णाच्या नातलगांची चांगलीच धावपळ उडाली ,मुरबाड शहरात असोसिएशन च्या वतीने एक मेडिकल स्टोअर सेवाभावी म्हणुन सुरु होते.  त्यामुळे  सर्व ग्राहकांची या दुकानावर औषधे घेण्यासाठी एकाच झुंबड उडाल्याचे पहावयास मिळाले.
          केंद्र सरकार च्या ईंटरनेट च्या माध्यमातुन औषध विक्री दिलेला आदेश तसेच भारतात कुठेही ई -फार्मसी ला व्यवसाय करण्याची मुभा दिल्याच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्टने आज बंद पुकारला होता.  अशा विक्री मुळे रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होउ शकतो. यामुळे केमिस्टच्या संघटनानी याचा निषेध करत आज बंद पाळला.  मुरबाड शहरातील औषधांची १८ दुकाने आज बंद होती.  तर तालुक्यातील सर्वच मेडिकल स्टोअर आज बंद मध्ये सहभागी होते. मात्र मुरबाड बस स्थानका शेजारील एक मेडीकल स्टोअर सेवा भावी रुपी सुरु ठेवल्याने रुग्णाच्या नातलगाना दिलासा मिळाला तर या ठिकाणी ग्राहकाची झुंबड ही पहायला मिळाली.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *