शिक्रापूर,पुणे : पुणे नगर रस्त्यावर प्रवाशी महिलेचे दागिने लांबविले,पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भिमा ते शिक्रापूर प्रवासा दरम्यानची घटना

1017

          शिक्रापूर,पुणे : पुणे नगर रस्त्यावर प्रवाशी महिलांचे दागिने लांबविणारी टोळी अनेक दिवसांपासून कार्यरत असल्याने अनेक महिलांचे दागीने व पर्स यापूर्वी चोरी गेलेले आहेत तर आता पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भिमा ता. शिरूर ते शिक्रापूर प्रवासा दरम्यान महिलेचे चौसष्ट हजार रुपयांचे दागिने अनोळखी महिलांनी लांबविले आहेत.

            याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती व फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी महिला माधुरी जाधव व त्यांचा मुलगा मधुसदन जाधव वाघोली येथून एम एच १४ बि टी ३१५८ या एस टी बस मधून प्रवास करत असताना जाधव यांनी त्यांचे सर्व दागिने त्यांच्या जवळील पर्स मध्ये ठवले. तर प्रवास सुरु असताना दोन अनोळखी महिला सदर एस टी बस मध्ये बसल्या. त्यांनतर काही वेळाने त्या महिला जाधव यांच्या जवळ आल्या आणि नंतर पुढे एस टी मधून खाली उतरल्या. त्यांनतर जाधव यांनी त्यांच्या पर्स मध्ये पाहिले असताना त्यांना त्यांचे दागिने नसल्याचे आढळून आले. त्यांनतर बस मध्ये आलेल्या महिलांनी त्यांचे दागिने लांबविले असल्याची खात्री जाधव यांची झाली. याबाबत माधुरी अंकुश जाधव रा. केसनंद ता. हवेली जि पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहेत.

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *