शिक्रापूर ( वढु बुद्रक ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वढु बुद्रक येथे शरदचद्र पवार माध्यमिक शाळेचे उदघाटन

494

शिक्रापूर : वढु बुद्रक येथे शरदचद्र पवार माध्यमिक शाळेचे उदघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले . हल्लीचे शिक्षण हे दिशा बदलणारे असून, अधुनिक शिक्षण हे शेतीसाठी ही उपयोगी पडले पाहिजे असे  मत  यावेळी पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन पुजा थिगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मण भंडारे यांनी केले. या प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, बापूसाहेब पठारे, शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षाताई शिवले, माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, प्रदिप कंद, निवृती गवारे , राष्टवादीचे शिरुर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, जि.प.सदस्या सविता बगाटे, जि.प.सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, बाळासाहेब नरके, प्रकाश पवार विठ्ठल मनियार, विवेक वळसे, प्रकाश म्हस्के ,नारायण फडतरे, यांच्या सह सोमनाथ भंडारे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अनेक दानशुर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष कामगिरी केल्याबद्दल  राष्ट्रपती पदक विजेते अरविंद गोकुळे याचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षण संस्थेने माझे नाव या शाळेला दिले असले तरी कसलीही बाधा न येता संस्था चांगल्या प्रकारे चालवावी अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.दरजेदार शिक्षण देऊन शालेय मुले मुली चांगल्या क्षेञात चमकल्या पाहीजे असेही ते म्हणाले.  कार्यक्रमाचे अभार शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

– प्रतिनिधी, राजाराम गायकवाड, (सा. समाजशील , शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *