शिक्रापूर, ता. शिरूर : रामलिंग संस्कृती भवन, शिरूर येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

1241

शिक्रापूर, ता. शिरूर : रामलिंग संस्कृती भवन, शिरूर येथे रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था आणि रामलिंग महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी डाँ. वैशाली साखरे यांनी ” मासिक पाळी आरोग्य स्वछता ” याविषयी मार्गदर्शन केले. वाण म्हणून सहेली सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. वाण देण्याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना याबाबत जनजागृती व्हावी तसेच महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका मनीषा कालेवार , आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्षा शशिकला काळे, राणी ताई चोरे, मंजुश्री थोरात, गोसावी मॅडम सिस्टर, ज्योती पारधी, वैशाली चव्हाण अनेक उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या सभासद छाया जगदाळे, गौरी पवार, निर्मला आबुज, यशोदा दसगुडे, रंजना दसगुडे, सुनंदा घावटे, साबळे काकू, हिराबाई जामदार, राणी शिंदे व अनेक मान्यवारांची उपस्थिती होती. अध्यक्षा राणी कर्डीले यांनी सर्वांचे आभार मानले.
                                                                                                   -प्रतिनिधी, राजाराम गायकवाड ( सा. समाजशील, शिक्रापूर,ता.शिरूर )




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *