वारजे माळवाडीत प्रभाग क्रमांक 32 मध्ये “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

1166
पुणे : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे गेली साडेचार वर्षे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियां बरोबर आकाशवाणी वरून मन की बात करत आहेत. विशेषता लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे लोकसभेच्या या पंचवार्षिक मधील त्यांचा हा बहुदा अखेरचा संवाद आहे त्यामुळेच या अखेरच्या संवादाचे भाजपच्यावतीने वारजे माळवाडीत प्रभाग क्रमांक 32 मध्ये मन की बात महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
        वारजे माळवाडीत प्रभाग क्रमांक 32 मध्ये वारजे हायवे चौकात सार्वजनिक स्वरूपात “मन की बात” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमात केंद्र सरकारने आगामी काळात काय करावे काय होणे गरजेचे आहे, कशाला प्राधान्य द्यावे. अशा प्रकारच्या सूचना किंवा मते लिखित स्वरूपात घेण्यात आल्या. या सर्व सूचना नंतर भाजपाच्या केंद्रीय जाहीरनामा समितीकडे पाठवण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट यांनी केले. व्यंकटेश दांगट, वंदना नवघरे, ऋषिकेश रजावात, अमजत अंन्सारी, दत्ता माने, विकास गंपले, गिरीश कुलकर्णी, शेकडो कामगार बंधू-भगिनींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले.
-प्रतिनिधी, सचिन दांगडेपाटील (सा. समाजशील, पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *