शिक्रापूर,शिरूर : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे वढू बुद्रुक येथे स्वछता अभियान संपन्न, १५० भक्तजन सहभागी

635

    शिक्रापूर,शिरूर : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ आणि के. ई. एम. हॉस्पिटल वढू बुद्रुक ता. शिरूर येथे भव्य स्वछता अभियान राबविण्यात आले.
सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असीम कृपाशिर्वादाने आणि मिशनचे चौथे सद्गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या ६५ व्या जयंती निमित्ताने शनिवार दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी संजय भिलारे (अध्यक्ष पेरणे फाटा ब्रांच) यांच्या मार्गर्शनाखाली , महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री.छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ आणि के. ई. एम. हॉस्पिटल वढू बुद्रूक येथे सकाळी नऊ ते दहा या वेळेत भव्य स्वछता अभियान संपन्न झाले.

यामध्ये १५० निरंकारी  भक्ताजनांनी सहभागी होत साफसफाई केली. “प्रदूषण अंधर हो या बाहर दोन्हो हानिकारक है ” असा संदेश “संत निरंकारी मिशन चे चौथे सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी महाराज” यांनी दिला होता, यातून प्रेरणा घेऊन १५० उत्साही भक्तजणानी हे अभियान राबविले.
या स्वच्छता अभियाना प्रसंगी  विक्रम पानसरे,उपाध्यक्ष, पेरणे फाटा ब्रांच, रेखाताई शिवले,सरपंच, वढू बुद्रूक,नारायणराव फडतरे,उपाध्यक्ष, पुणे जिल्हा रा. कांग्रेस,शांताराम भंडारे विश्वस्त ,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज  ट्रस्ट वढू, दिलीप रणसिंगे,अध्यक्ष, पॉवर हाऊस,
बबनराव गव्हाणे,वनिता आढाव-फडतरे,डॉ. कवडे – के. ई. एम. हॉस्पिटल व  अन्य मान्यवर उपस्थित होते.
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण देशात ३५० शहरात ७६५ सरकारी हॉस्पिलमध्ये स्वछता अभियान राबविण्यात आले आहे.सर्व भक्ताजनांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *