मुरबाड,ठाणे : पंधरा दिवसा पुर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, हत्या झाली असल्याचा संशय, या प्रकरणी ३ संशयीत पोलिसांच्या ताब्यात

845
           मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील काकडपाडा येथिल कल्पेश चौधरी (22) हा तरुण गेल्या पंधरादिवसा पासुन बेपत्ता होता. त्याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र  पंधरा दिवसा पासुन त्याचा कुठेही तपास न लागल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु होती.
          काल गुरुवारी सकाळी  मुरबाड- म्हसा रोडवरिल किंडमा कंपनी  समोरील परिसरात दुर्गधी सुटल्याने त्याचा शोध घेतला असता एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याचे कपडे ,बुट  व मोबाइल वरुन हा कल्पेश चौधरी याचाच मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता ही हत्या असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांनी ३ संशयीतांना ताब्यात घेतले आहे.हा
 तरुण जि. प.  शाळा शिरवली जवळील एका फार्म हाउस मध्ये कामाला असल्याचे सांगण्यात आले.
            मुरबाड पोलिसांना घटनेची माहीती मिळताच ते घटना स्थळी रवाना झाले होते. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या  हाडाचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असल्याचे पोलिस सुत्रानी सांगितले .संशयीताकडुन पोलिस कसुन तपास करत आहेत.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *