शिक्रापूर,शिरूर : बार्टी तर्फे आरटीईचे विनामूल्य अर्ज भरून देण्याच्या उपक्रमास उदंड प्रतिसाद – शितल बंडगर

1038
          शिक्रापूर,शिरूर : बार्टी तर्फे आरटीईचे विनामूल्य अर्ज भरून देण्याच्या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला असून शिरुर,दौंड,खेड,तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत कक्षा मार्फत बालकांच्या शिक्षण आधिकार कायदा 2009 (आरटीई) अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून  महाराष्ट्रभर कार्यशाळा व मदत केंद्राचे काम झाले. बार्टीचे महासंचालक कैलास कणसे व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांच्या नियोजनाने शिरुर खेड व दौंड ह्या ठिकाणी मदत केंद्राचे काम पार पडले. समतादूत अनिल नरके यांनी ग्रामपंचायत केडगाव,तळेगाव ढमढेरे,चाकण बीड वस्ती आणि शिरूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ह्या ठिकाणी कामकाज पाहिले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला अनेक गरजू लोकांचे ऑनलाईन अर्ज ह्यावेळी मोफत भरून देण्यात आले व पुढील प्रक्रिया त्यांना समजावून सांगण्यात आली.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खेड समतादूत रुपाली भुजबळ व शिरूर समतादूत रेश्मा साळवे व दौंड समतादूत अनिल नरके यांनी विशेष कष्ट घेतले.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *