टाकळी हाजी,शिरूर : १५ एकरात ६ हजार डाळिंब झाडे,२ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे तळे,लाखो रुपयांचे मिळतेय उत्पन्न,माळवाडीच्या आनंदा विठ्ठल भाकरे तरुणाचा शेतीतील प्रयत्न यशस्वी

706
          टाकळी हाजी,शिरूर : सध्याच्या युगात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाण असून नोकरीच्या मागे न लागता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती या म्हणीला फाटा देत टाकळी हाजीच्या  माळवाडी येथील आनंदा विठ्ठल भाकरे या तरुणाने उत्तम व प्रगत शेती करुन या परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.
           माळवाडी येथिल या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता आपल्या वडिलोपार्जित १५ एकर क्षेञामध्ये सहा हजार डाळिंबाच्या रोपांची लागवड सहा वर्षापुर्वी केली.१५ बाय १० च्या अंतरावर लागवड करुन त्या सर्व झाडांना ठिबक सिंचनचा वापर केला आहे.अत्याधुनिक फवारणीयंञ व छोटा २५ एचपीचा ट्रक्टरचा वापर करुन ते या सर्व झाडांची फवारणी करतात.ते अतिशय अशी मेहनत करुन उत्कृष्ट अशी डाळिंबाची गुणवत्ता असलेली फळे पिकवतात.दरवर्षी त्यांची डाळिंब परदेशात निर्यात  होत असून त्यांच्या डाळिंबाला बाजारभाव देखिल चांगल्या प्रमाणात मिळत असतो.
चालू वर्षी भीषण दुष्काळ असल्याने त्यांनी आपल्या ५५ गुंठे क्षेञात ३२० बाय १९० (फुट) व तिस फुट उंचीचे शेततळे बनवले असून त्यामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.सुमारे दोन कोटी लिटर पाणी क्षमतेचे हे तळे बनवले असून या तळ्याला ११लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.परंतु अतिशय कडक अशा दुष्काळात देखिल त्यांना पाण्याची कमतरता जाणवत नसून त्यांची डाळिंबाची झाडे हिरवीगार बहरलेली असून त्यांची डाळिंबाची तोडणी चालू आहे.  दरवर्षी त्यांना या फळबागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी या भागातील शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केल्याने परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या या बागेला आवर्जून भेटी देण्यासाठी येत आहेत.
– सतीश भाकरे,विशेष प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *