लांडेवस्ती शाळेचा प्रेरणादायी प्रवेशोत्सव; नवीन विद्यार्यांचे केले स्वागत

516

शिक्रापूर,ता.शिरूर(-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जि.प.प्राथ.शाळा लांडेवस्ती, केंद्र – तळेगाव ढमढेरे या शाळेत नवागतांचे स्वागत अतिशय आनंददायी वातावरणात करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण केलेल्या व नवीन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन, फुगे झुरमुळ्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून शाळेत आणले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक व लेखणी वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सवास तळेगाव ढमढेरे गावाच्या उपसरपंच उज्वला भुजबळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनिता लांडे व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.  तसेच सर्व बालचमूंनी Happy Birthday गीत गाऊन शाळेच्यावतीने उपसरपंच उज्वला भुजबळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भुजबळ यांच्या कडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतून बदली झालेल्या शिक्षिका अलका शिंदे मॅडम यांना निरोप देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. बदली होऊन या शाळेत आलेल्या विजया लोंढे मॅडम यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका सरस्वती शिनलकर व शोभा शिनलकर यांनी अंगणवाडीच्या मुलांना गुलाबपुष्प, वही पेन्सिल वाटप केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा महंमदरफिक शेख यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार मानले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *